वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

आम्ही Family Link बद्दल काही वारंवार विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे गोळा केली आहेत. तुम्ही आधीपासूनच अ‍ॅप वापरत असल्यास आणि तुम्हाला स्वतःचा प्रश्न विचारायचा असल्यास, अधिक माहितीसाठी, तुम्ही आमचे मदत केंद्र पाहू शकता.

ते कसे काम करते

Family Link कसे काम करते?

Google चे Family Link अ‍ॅप पालकांना माहिती ठेवण्यात आणि त्यांचे लहान किंवा किशोरवयीन मूल Android आणि ChromeOS डिव्हाइसवर एक्स्प्लोअर करत असताना त्याला ऑनलाइन अधिक सुरक्षित ठेवण्यात मदत करते.

प्रथम, लहान/किशोरवयीन मुलाकडे कंपॅटिबल डिव्हाइस असावे लागेल (Family Link सोबत कोणती डिव्हाइस काम करतात ते पहा). त्यानंतर, लहान/किशोरवयीन मुलाला डिव्हाइसमध्ये साइन इन करा. लहान/किशोरवयीन मुलाचे Family Link आधीपासून पर्यवेक्षण करत असल्यास, साइन अप केल्याने पालक नियंत्रणे सेट करण्यात त्यांना मदत होईल. Family Link किशोरवयीन मुलाचे आधीपासून पर्यवेक्षण करत नसल्यास, पालक Android सेटिंग्ज मधूनदेखील Family Link जोडू शकतात.

पालक त्यांच्या १३ वर्षाखालील (किंवा तुमच्या देशातील लागू वयाच्या) लहान मुलासाठीदेखील Google खाते तयार करू शकतात. पूर्ण झाल्यावर, लहान मुले त्यांचे नवीन खाते वापरून डिव्हाइसमध्ये साइन इन करू शकतात.

खाती लिंक केली गेल्यावर, स्क्रीन वेळेवर लक्ष ठेवणे आणि त्यांच्या लहान मुलाला वयानुसार योग्य आशयाबाबत मार्गदर्शन करण्यात मदत होण्यासाठी, पालक Family Link वापरू शकतात.

माझ्या लहान मुलासाठी अयोग्य असलेला सर्व आशय Family Link ब्लॉक करते का?

Family Link अयोग्य आशय ब्लॉक करत नाही, पण त्यामधील सेटिंग्ज तुम्हाला फिल्टर करण्याचे पर्याय पुरवतात. Search, Chrome आणि YouTube यांसारख्या ठरावीक Google अ‍ॅप्समध्ये फिल्टर करण्याचे पर्याय उपलब्ध आहेत, जे तुम्हाला Family Link मध्ये सापडू शकतात. कृपया लक्षात ठेवा, हे फिल्टर परिपूर्ण नाहीत, त्यामुळे तुम्हाला तुमच्या लहान मुलाने पहायला नको असलेला भडक, ग्राफिक किंवा इतर आशय काही वेळा दिसू शकतो. तुमच्या कुटुंबासाठी योग्य काय हे ठरवण्यासाठी आम्ही अ‍ॅप सेटिंग्ज तसेच Family Link देऊ करत असलेली सेटिंग्ज आणि टूलचे पुनरावलोकन करण्याची शिफारस करतो.

पालक Android वर Family Link वापरू शकतात का?

होय. Lollipop (5.0) किंवा त्यावरील आवृत्ती रन करणार्‍या Android डिव्हाइसवर पालक Family Link रन करू शकतात.

पालक iOS वर Family Link वापरू शकतात का?

होय. iOS 11 किंवा त्यावरील आवृत्ती रन करणार्‍या iPhone वर पालक Family Link रन करू शकतात.

पालक वेब ब्राउझरवर Family Link वापरू शकतात का?

पालक त्यांच्या लहान मुलाची जवळपास सर्व खाते सेटिंग्ज आणि वैशिष्ट्ये वेब ब्राउझरवर व्यवस्थापित करू शकतात. अ‍ॅप डाउनलोड करण्याची गरज नाही.

Android डिव्हाइसवर Family Link लहान किंवा किशोरवयीन मुलांचे पर्यवेक्षण करू शकते का?

सर्वोत्तम परिणामांसाठी, Family Link पर्यवेक्षण करत असलेल्या लहान किंवा किशोरवयीन मुलांनी 7.0 (Nougat) अथवा त्यावरील आवृत्ती रन करणारी Android डिव्हाइस वापरावीत अशी आम्ही शिफारस करतो. Android च्या 5.0 आणि 6.0 (Lollipop आणि Marshmallow) या आवृत्त्या रन करणार्‍या डिव्हाइसनादेखील Family Link सेटिंग्ज लागू केलेली असू शकतात. अधिक जाणून घेण्यासाठी, आमचे मदत केंद्र पहा.

Chromebook (ChromeOS) वर Family Link लहान किंवा किशोरवयीन मुलांचे पर्यवेक्षण करू शकते का?

होय, लहान किंवा किशोरवयीन मुलांनी Chromebook वर त्यांच्या Google खाते मध्ये साइन इन केल्यावर त्यांचे पर्यवेक्षण केले जाऊ शकते. पालक त्यांच्या लहान मुलांची Chromebook आणि खाते सेटिंग्ज व्यवस्थापित करणे व वेबसाइटवरील बंधने सेट करणे यांसारख्या गोष्टी करू शकतात. येथे अधिक जाणून घ्या.

iOS डिव्हाइस आणि वेब ब्राउझरवर Family Link लहान किंवा किशोरवयीन मुलांचे पर्यवेक्षण करू शकते का?

iOS, वेब ब्राउझर किंवा पर्यवेक्षित न केलेल्या इतर डिव्हाइसमध्ये साइन इन केलेल्या लहान अथवा किशोरवयीन मुलांचे फक्त अंशतः पर्यवेक्षण केले जाऊ शकते. लहान आणि किशोरवयीन मुले त्यांच्या पालकांच्या संमतीने iOS डिव्हाइस आणि वेब ब्राउझरवर त्यांच्या Google खाते मध्ये साइन इन करू शकतात. पालक YouTube आणि Google Search वर त्यांच्या लहान मुलाच्या खात्याची काही सेटिंग्ज व्यवस्थापित करू शकतात आणि लहान मुलाने साइन इन केलेले असताना व ते iOS डिव्हाइस किंवा वेबवर Google अ‍ॅप्स व सेवांचा वापर करत असताना ती सेटिंग्ज लागू होतील. तुमचे लहान मूल वापरू शकेल अशी अ‍ॅप्स व्यवस्थापित करणे, त्याला Chrome वर काय दिसते ते फिल्टर करणे आणि स्क्रीन वेळ मर्यादा सेट करणे यांसारखी Family Link अ‍ॅपमधील इतर वैशिष्ट्ये iOS डिव्हाइस किंवा वेबवरील लहान मुलाच्या अ‍ॅक्टिव्हिटीला लागू होणार नाहीत. लहान/किशोरवयीन मुलांच्या iOS डिव्हाइस आणि वेब ब्राउझर यांवरील साइन इनबद्दल अधिक जाणून घ्या.

लहान मुलाचे डिव्हाइस आणि Google खाते सेट करण्यासाठी किती वेळ लागतो?

तुमच्या लहान मुलाचे Google खाते आणि Android डिव्हाइस सेट करण्यासाठी, तुम्ही सुमारे १५ मिनिटे काढली पाहिजेत.

खाती

लहान मुलाकडे Family Link व्यवस्थापित करत असलेले Google खाते असण्यासाठी किमान वयोमर्यादा आहे का?

नाही. तुमचे लहान मूल त्याचा पहिला Android फोन किंवा ChromeOS डिव्हाइस वापरण्यासाठी कधी तयार असेल हे ठरवणे तुमच्या हाती आहे.

माझ्या लहान मुलाने त्याच्या Google खात्यामध्ये साइन इन केलेले असताना त्याला जाहिराती दिसतील का?

Google च्या सेवा जाहिरातींना सपोर्ट असलेल्या आहेत आणि आमची उत्पादने वापरताना तुमच्या लहान मुलाला जाहिराती दिसू शकतात. मात्र, त्यांना पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती दिसणार नाहीत आणि लहान मुलाला अ‍ॅप्समध्ये जाहिराती कधी दिसतात हे ओळखण्यासाठी तुम्हाला टूल पुरवली जातील.

मला माझ्या किशोरवयीन मुलाच्या पर्यवेक्षणासाठी Family Link वापरता येईल का?

होय, Family Link किशोरवयीन मुलांच्या (१३ वर्षांवरील किंवा तुमच्या देशामध्ये लागू असलेल्या संमती वयाची लहान मुले) पर्यवेक्षणासाठी वापरले जाऊ शकते. किशोरवयीन मुलांकडे कोणत्याही वेळी पर्यवेक्षण थांबवण्याची क्षमता असते, जी संमती वयापेक्षा कमी वयाच्या मुलांकडे नसते. त्यांनी तसे केल्यास, तुम्हाला सूचित केले जाईल आणि त्यांचे Android डिव्हाइस, तुम्ही अनलॉक न केल्यास, २४ तासांसाठी तात्पुरते लॉक केले जाईल. पालक म्हणून, किशोरवयीन मुलांच्या डिव्हाइसच्या उपयुक्ततेवर कोणताही परिणाम न होता, तुम्ही त्यांच्यासाठी पर्यवेक्षण काढून टाकणेदेखील निवडू शकता.

शाळा किंवा ऑफिसमार्फत मिळालेले माझे खाते मला माझे कुटुंब व्यवस्थापित करण्यासाठी वापरता येईल का?

नाही. ऑफिस किंवा शाळेने पुरवलेली खाती कुटुंब गट व्यवस्थापित करण्यासाठी किंवा Family Link मार्फत पर्यवेक्षण व्यवस्थापित करण्यासाठी वापरली जाऊ शकत नाहीत. Family Link सोबत तुम्ही Gmail खात्यासारखे तुमचे वैयक्तिक Google खाते वापरू शकता.

लहान मुलांकडे त्यांच्या पर्यवेक्षित केलेल्या डिव्हाइसवर जोडलेली एकाहून अधिक Google खाती असू शकतात का?

सर्वसाधारणपणे, नाही. लहान मुलांना त्यांच्या पर्यवेक्षित केलेल्या वैयक्तिक Google खाते व्यतिरिक्त फक्त Google Workspace for Education खाते जोडण्याची अनुमती आहे. ही मर्यादा आम्हाला उत्पादनासंबंधी महत्त्वाची वर्तने राखण्यात मदत करते. उदाहरणार्थ, डिव्हाइसवर दुसरे खाते अस्तित्वात असल्यास, Play वरून अ‍ॅप्स डाउनलोड करण्यासाठी, लहान मुले त्या खात्यावर पालकाच्या मंजुरीशिवाय स्विच करू शकतात.

माझे लहान मूल १३ वर्षांचे (किंवा तुमच्या देशातील लागू असलेल्या वयाचे) झाल्यावर काय होते?

तुमच्या लहान मुलाचे वय १३ वर्षे (किंवा तुमच्या देशातील लागू वय) पूर्ण झाल्यावर, त्याच्याकडे पर्यवेक्षित न केलेल्या Google खाते वर जाण्याचा पर्याय असतो. लहान मूल १३ वर्षांचे होण्यापूर्वी, पालकांना एक ईमेल मिळेल, ज्यामध्ये त्यांना कळवले जाईल, की त्यांचे लहान मूल त्याच्या वाढदिवसाला त्याच्या खात्याचा ताबा स्वतःकडे घेण्यास पात्र होईल, ज्यामुळे यापुढे तुम्ही त्याचे खाते व्यवस्थापित करू शकणार नाही. ज्या दिवशी लहान मुले १३ वर्षांची होतात त्या दिवशी ती त्यांचे Google खाते स्वतः व्यवस्थापित करणे किंवा त्यांच्यासाठी त्यांच्या पालकांना व्यवस्थापित करू देणे सुरू ठेवणे निवडू शकतात. पालक म्हणून, लहान मुलाचे वय १३ वर्षांपेक्षा जास्त झाल्यावर तुम्ही कधीही पर्यवेक्षण काढून टाकणेदेखील निवडू शकता.

तयार आहात का? ॲप मिळवा.

तुमच्या डिव्हाइसवर Family Link डाउनलोड करा जेणेकरून तुमचे लहान मूल एक्स्प्लोर करत असताना तुम्हाला माहिती असेल.

स्मार्टफोन नाही का?

तुम्ही पर्यवेक्षण ऑनलाइन सेट करू शकता.
अधिक जाणून घ्या