वय वर्षे सहा ते आठ
वय वर्षे ९ ते १२
वय वर्षे १३ ते १७

Google वरील तुमच्या गोपनीयतेबद्दल जाणून घ्यायचे आहे का?

तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात! मुलांकडून सर्वात जास्त वेळा विचारले जाणारे प्रश्न वाचा, जसे की, तुमचे पालक तुमच्या Google शी संबंधित गोष्टींबाबत कशी मदत करू शकतात, Google कोणती माहिती वापरते, आणि बरेच काही.

पालक, ही माहिती फक्त १३ वर्षे (किंवा तुमच्या देशातील लागू वय) वयाखालील मुलांसाठी Family Link वापरून व्यवस्थापित केलेली Google खाती यांना लागू होते. अधिक तपशिलांसाठी, आमची गोपनीयता सूचना आणि गोपनीयता धोरण पहा.

माझ्या खात्याचे नियंत्रक कोण आहे?

तुमचे पालक तुमच्या Google खाते चे नियंत्रक आहेत. ते व्यवस्थापित करण्यासाठी, ते Family Link नावाचे अ‍ॅप वापरू शकतात. तुम्ही आणखी मोठे झाल्यावर तुमच्या खात्याचे नियंत्रण मिळवू शकता.

तुमचे पालक पुढील गोष्टी करू शकतात:

  • तुमच्या खात्यामध्ये साइन इन करणे, तुमचा खाते पासवर्ड बदलणे किंवा तुमचे खाते हटवणे.
  • तुमचा फोन किंवा टॅबलेट लॉक करणे.
  • तुमचा फोन किंवा टॅबलेट कुठे आहे ते पाहणे.
  • तुम्ही कोणती अ‍ॅप्स वापरू शकता ते निवडणे.
  • तुम्ही तुमची अ‍ॅप्स किती वेळा वापरता ते पाहणे.
  • तुम्हाला Google Search, YouTube किंवा Google Play यांसारख्या काही Google अ‍ॅप्समध्ये दिसणार्‍या गोष्टी बदलणे.
  • तुमची अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल निवडणे. (ही तुम्ही Google वापरून काय करता त्याबद्दलची माहिती सेव्ह करणारी सेटिंग्ज आहेत.)
  • तुमच्या अ‍ॅप्ससाठी सेटिंग्ज आणि परवानग्या निवडणे.
  • तुमच्या खात्यासाठी नाव, जन्मतारीख आणि इतर माहिती निवडणे.
  • Google Play सारख्या काही Google उत्पादनांमध्ये तुम्ही काय डाउनलोड आणि खरेदी करू शकता ते निवडणे.

Google माझी माहिती कशी आणि का वापरते?

तुम्ही किंवा तुमचे पालक आम्हाला देत असलेली तुमचे नाव आणि जन्मतारीख यांसारखी माहिती आम्ही सेव्ह करू शकतो. तुम्ही आमची अ‍ॅप्स आणि साइट वापरत असतानादेखील आम्ही माहिती सेव्ह करतो. ही माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करतो आणि ती वेगवेगळ्या कारणांसाठी वापरतो — जसे की, Google अ‍ॅप्स आणि साइट आणखी उपयुक्त बनवणे.

तुमच्या पालकांसोबत, आम्ही तुमची माहिती ज्या मार्गांनी वापरू शकतो त्या काही मार्गांबद्दल अधिक जाणून घ्या:

  • आमच्या अ‍ॅप्स आणि साइटना काम करण्यास लावणे: उदाहरणार्थ, तुम्ही Google Search वर कुत्र्याची पिल्ले" शोधल्यास, आम्ही तुमची माहिती तुम्हाला कुत्र्याच्या पिल्लांसंबंधी गोष्टी दाखवण्यासाठी वापरतो.
  • आमची अ‍ॅप्स आणि साइट अधिक चांगल्या बनवणे: उदाहरणार्थ, एखादी गोष्ट नादुरुस्त झाल्यास, आम्ही ती दुरुस्त करण्यासाठी माहिती वापरू शकतो.
  • Google, आमचे वापरकर्ते आणि लोकांचे संरक्षण करणे: लोकांना ऑनलाइन आणखी सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही माहिती वापरतो.
  • नवीन अ‍ॅप्स आणि साइट तयार करणे: आम्हाला तयार करता येणार्‍या Google मधील नवीन गोष्टींसाठी कल्पना मिळवण्याकरिता, लोक आमची सध्याची अ‍ॅप्स आणि साइट कशी वापरतात ते आम्ही जाणून घेतो.
  • तुम्हाला आवडू शकतील अशा गोष्टी दाखवणे: उदाहरणार्थ, तुम्हाला YouTube Kids वर प्राण्यांचे व्हिडिओ पाहणे आवडत असल्यास, आम्ही तुम्हाला आणखी व्हिडिओ दाखवू शकतो.
  • तुम्ही ज्यावर आहात त्या साइटसारख्या गोष्टींच्या आधारावर तुम्हाला जाहिराती दाखवणे.
  • तुमच्याशी संवाद साधणे: उदाहरणार्थ, तुम्हाला मेसेज करण्यासाठी आम्ही तुमचा ईमेल अ‍ॅड्रेस वापरू शकतो. तुम्ही ओळखत नसलेल्या एखाद्या व्यक्तीकडून आलेला मेसेज उघडण्याआधी नेहमी तुमच्या पालकांना विचारा.

Google ने काय सेव्ह करायचे ते मला सांगता येईल का?

होय, आम्ही सेव्ह करत असलेल्या तुमच्याबद्दलच्या काही गोष्टी तुम्ही बदलू शकता. तुम्ही तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल यासारख्या काही गोपनीयता सेटिंग्जमध्ये बदल केल्यास, आम्ही तुमच्या पालकांना कळवू. ते तुम्हाला तुमची सेटिंग्ज बदलणे यातदेखील मदत करू शकतात.

तुम्ही आणि तुमचे पालक कधीही तुमच्याबद्दलची व तुमच्या Google खाते बद्दलची काही माहिती पाहणे आणि व्यवस्थापित करणे हे करू शकता.

Google कधीही माझी वैयक्तिक माहिती इतरांसोबत शेअर करते का?

तुमच्या नावासारखी तुमची वैयक्तिक माहिती आम्ही Google च्या बाहेर शेअर करू शकतो याची काही कारणे आहेत. आम्ही ही माहिती शेअर केल्यास, ती संरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी आम्ही पावले उचलतो.

आम्ही काही वैयक्तिक माहिती शेअर करू शकतो:

  • तुमचे पालक आणि Google वरील कुटुंब गटासोबत
  • आम्ही ज्यांच्यासोबत काम करतो त्या कंपन्यांसोबत
  • तुमच्या पालकांची मान्यता असल्यावर
  • आम्हाला कायदेशीर कारणांसाठी आवश्यकता भासल्यावर

मी ऑनलाइन शेअर करत असलेले आणखी कोण पाहू शकते?

ईमेल किंवा फोटो यांसारखी तुम्ही ऑनलाइन शेअर करत असलेली कोणतीही गोष्ट खूप लोकांना पाहता येऊ शकते. फक्त तुमचा विश्वास असलेल्या लोकांसोबत शेअर करा. तुम्हाला खात्री नसल्यास, पालकांना किंवा कुटुंब सदस्याला विचारा.

अधिक जाणून घ्यायचे आहे का? तुमच्या पालकांना आमचे गोपनीयता धोरण वाचण्यात तुम्हाला मदत करण्यास सांगा.

Google वरील तुमच्या गोपनीयतेबद्दल जाणून घ्यायचे आहे का?

तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात! तुम्ही आमची अ‍ॅप्स आणि साइट वापरत असताना Google माहिती कशी गोळा करते आणि वापरते ते तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. तुमचे Google खाते आणि डिव्हाइस व्यवस्थापित करण्यात तुमचे पालक तुम्हाला कशी मदत करू शकतात तेदेखील तुम्ही जाणून घ्याल.

पालक, ही माहिती फक्त १३ वर्षे (किंवा तुमच्या देशातील लागू वय) वयाखालील मुलांसाठी Family Link वापरून व्यवस्थापित केलेली Google खाती यांना लागू होते. अधिक तपशिलांसाठी, आमची गोपनीयता सूचना आणि गोपनीयता धोरण पहा.

माझ्या खात्याचे नियंत्रक कोण आहे?

या क्षणी, तुमचे पालक तुमच्या Google खाते चे नियंत्रक आहेत. तुमचे खाते स्वतः व्यवस्थापित करण्यासाठी तुमचे पुरेसे वय होईपर्यंत, ते व्यवस्थापित करण्यात तुम्हाला मदत करण्याकरिता ते Family Link नावाचे अ‍ॅप वापरू शकतात.

तुमचे पालक पुढील गोष्टी करू शकतात:

  • तुमच्या खात्यामध्ये साइन इन करणे, तुमचा खाते पासवर्ड बदलणे किंवा तुमचे खाते हटवणे.
  • तुम्ही फोन किंवा टॅबलेट यांसारखी तुमची डिव्हाइस कधी आणि किती वापरू शकता त्यावर मर्यादा घालणे.
  • तुमचा फोन किंवा टॅबलेट कुठे आहे ते पाहणे.
  • तुम्ही वापरू शकत असलेली अ‍ॅप्स निवडणे.
  • तुम्ही तुमची अ‍ॅप्स किती वेळा वापरता ते पाहणे.
  • Google Search, YouTube किंवा Google Play यांसारख्या काही Google अ‍ॅप्स आणि साइटसाठी आशय सेटिंग्ज व्यवस्थापित करणे. ही सेटिंग्ज तुम्ही काय पाहता ते बदलू शकतात.
  • तुम्हाला ही नियंत्रणे स्वतः व्यवस्थापित करण्यापासून ब्लॉक करण्यासह, तुमच्या खात्यासाठी अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल व्यवस्थापित करणे, जसे की YouTube इतिहास.
  • तुमच्या फोन किंवा टॅबलेटवरील अ‍ॅप्ससाठी परवानग्यांचे पुनरावलोकन करणे, जसे की, अ‍ॅप्स तुमचा मायक्रोफोन, कॅमेरा अथवा संपर्क वापरू शकतात का.
  • तुमचे नाव, लिंग किंवा जन्मतारीख यांसारखी तुमच्या खात्याबद्दलची माहिती पाहणे, बदलणे अथवा हटवणे.
  • Google Play सारख्या काही Google अ‍ॅप्स आणि साइटवर तुमच्या डाउनलोडना आणि खरेदीला मंजुरी देणे.

Google माझी माहिती कशी आणि का वापरते?

बहुतांश साइट आणि अ‍ॅप्सप्रमाणे, आम्ही तुमचे नाव आणि जन्मतारीख यांसारखी तुम्ही किंवा तुमच्या पालकांनी आम्हाला दिलेली माहिती गोळा करतो आणि तुम्ही आमची अ‍ॅप्स व साइट वापरत असताना आम्ही माहिती गोळा करतो. ही माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करतो आणि ती आमची उत्पादने तुमच्यासाठी आणखी उपयुक्त बनवणे यासारख्या गोष्टींसाठी वापरतो. उदाहरणार्थ आम्ही पुढील गोष्टी करण्यासाठी डेटा गोळा करतो:

  • आमच्या अ‍ॅप्स आणि साइटना काम करण्यास लावणे: उदाहरणार्थ, तुम्ही Google Search वर "क्रीडा" शोधल्यास, आम्ही तुमची माहिती तुम्हाला क्रीडांसंबंधी गोष्टी दाखवण्यासाठी वापरतो.
  • आमची अ‍ॅप्स आणि साइट अधिक चांगल्या बनवणे: उदाहरणार्थ, एखादी गोष्ट नादुरुस्त झाल्यास, आम्ही ती दुरुस्त करण्यासाठी माहिती वापरू शकतो.
  • Google, आमचे वापरकर्ते आणि लोकांचे संरक्षण करणे: लोकांना ऑनलाइन आणखी सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही माहिती वापरतो, जसे की, फसवणूक शोधणे आणि रोखणे.
  • नवीन अ‍ॅप्स आणि साइट तयार करणे: आम्हाला तयार करता येणार्‍या नवीन Google उत्पादनांसाठी कल्पना मिळवण्याकरिता, लोक आमची सध्याची अ‍ॅप्स आणि साइट कशी वापरतात ते आम्ही जाणून घेतो.
  • तुमच्यासाठी माहिती पर्सनलाइझ करणे, म्हणजे तुम्हाला आवडू शकतील असे आम्हाला वाटणार्‍या गोष्टी तुम्हाला दाखवणे. उदाहरणार्थ, तुम्हाला YouTube Kids वर प्राण्यांचे व्हिडिओ पाहणे आवडत असल्यास, आम्ही पाहण्यासाठी आणखी व्हिडिओची शिफारस करू शकतो.
  • तुम्ही ज्यावर आहात त्या साइटसारख्या गोष्टींच्या आधारावर तुम्हाला जाहिराती दाखवणे.
  • तुमच्याशी संवाद साधणे: उदाहरणार्थ, तुम्हाला मेसेज करण्यासाठी आम्ही तुमचा ईमेल अ‍ॅड्रेस वापरू शकतो, जसे की, सुरक्षेसंबंधी समस्या असल्यास. तुम्ही ओळखत नसलेल्या एखाद्या व्यक्तीकडून आलेला मेसेज उघडण्याआधी नेहमी तुमच्या पालकांना विचारा.

Google ने काय सेव्ह करायचे ते मला सांगता येईल का?

होय, आम्ही सेव्ह करत असलेल्या तुमच्याबद्दलच्या काही गोष्टी तुम्ही बदलू शकता. उदाहरणार्थ, आम्ही तुमचा YouTube इतिहास तुमच्या Google खाते वर सेव्ह करणे तुम्हाला नको असल्यास, तुम्ही YouTube इतिहास बंद करू शकता. तुम्ही तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल यासारख्या काही गोपनीयता सेटिंग्जमध्ये बदल केल्यास, आम्ही तुमच्या पालकांना कळवू. ते तुम्हाला तुमची सेटिंग्ज बदलणे यातदेखील मदत करू शकतात.

तुम्ही आणि तुमचे पालक कधीही तुमच्याबद्दलची व तुमच्या Google खाते बद्दलची काही माहिती पाहणे आणि व्यवस्थापित करणे हे करू शकता.

Google कधीही माझी वैयक्तिक माहिती इतरांसोबत शेअर करते का?

तुमचे नाव आणि ईमेल अ‍ॅड्रेस यांसारखी तुमची वैयक्तिक माहिती आम्ही Google च्या बाहेर शेअर करू शकतो याची काही कारणे आहेत. आम्ही ही माहिती शेअर केल्यास, ती संरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी आम्ही पावले उचलतो.

आम्ही काही वैयक्तिक माहिती शेअर करू शकतो:

  • तुमचे पालक आणि Google वरील कुटुंब गटासोबत
  • आम्ही ज्यांच्यासोबत काम करतो त्या कंपन्यांसोबत
  • तुमच्या पालकांची मान्यता असल्यावर
  • आम्हाला कायदेशीर कारणांसाठी आवश्यकता भासल्यावर

मी ऑनलाइन शेअर करत असलेले आणखी कोण पाहू शकते?

ईमेल किंवा फोटो यांसारखी तुम्ही ऑनलाइन शेअर करत असलेली कोणतीही गोष्ट खूप लोकांना पाहता येऊ शकते. एकदा ऑनलाइन शेअर केले गेल्यावर, ते काढून टाकणे कठीण होऊ शकते. फक्त तुमचा विश्वास असलेल्या लोकांसोबत शेअर करा. तुम्हाला खात्री नसल्यास, पालकांना किंवा कुटुंब सदस्याला विचारा.

अधिक जाणून घ्यायचे आहे का? तुमच्या पालकांना आमचे गोपनीयता धोरण वाचण्यात तुम्हाला मदत करण्यास सांगा.

Google वरील तुमच्या गोपनीयतेबद्दल जाणून घ्यायचे आहे का?

तुम्ही आमची अ‍ॅप्स आणि साइट वापरत असताना Google माहिती कशी गोळा करते आणि वापरते ते तुम्ही येथे जाणून घेऊ शकता. तुमचे Google खाते आणि डिव्हाइस व्यवस्थापित करण्यात तुमचे पालक तुम्हाला कशी मदत करू शकतात तेदेखील तुम्ही जाणून घ्याल.

ही माहिती फक्त स्वतःचे खाते व्यवस्थापित करण्यासाठी किमान आवश्यकतेपेक्षा कमी वयाची असलेली लहान मुले आणि किशोर यांच्याकरिता Family Link वापरून व्यवस्थापित केलेली Google खाती यांना लागू होते. अधिक माहितीसाठी, आमची गोपनीयता सूचना आणि गोपनीयता धोरण पहा.

माझे पालक खाते व्यवस्थापित करण्यात मला मदत करू शकतात का?

तुमच्या Google खाते चे पैलू व्यवस्थापित करण्यात मदत करण्यासाठी तुमचे पालक Family Link नावाचे अ‍ॅप वापरू शकतात. तुमच्या डिव्हाइसनुसार, ते पुढीलप्रमाणे गोष्टी करू शकतात:

  • तुमच्या खात्यामध्ये साइन इन करणे, तुमचा खाते पासवर्ड बदलणे किंवा तुमचे खाते हटवणे.
  • तुम्ही तुमची डिव्हाइस किती आणि कधी वापरू शकता त्यावर मर्यादा घालणे.
  • तुमच्या साइन-इन केलेल्या आणि अ‍ॅक्टिव्ह डिव्हाइसचे स्थान पाहणे.
  • तुमची अ‍ॅप्स व्यवस्थापित करणे आणि ती तुम्ही किती वापरता ते पाहणे.
  • Google Search, YouTube किंवा Google Play यांसारख्या काही Google अ‍ॅप्स आणि साइटसाठी आशय सेटिंग्ज व्यवस्थापित करणे. ही सेटिंग्ज तुम्ही काय पाहता ते बदलू शकतात.
  • तुम्हाला ही नियंत्रणे स्वतः व्यवस्थापित करण्यापासून ब्लॉक करण्यासह, तुमच्या खात्यासाठी अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल व्यवस्थापित करणे, जसे की YouTube इतिहास.
  • तुमच्या डिव्हाइसवरील अ‍ॅप्ससाठी परवानग्यांचे पुनरावलोकन करणे, जसे की, अ‍ॅप्स तुमचा मायक्रोफोन, कॅमेरा अथवा संपर्क वापरू शकतात का.
  • तुमचे नाव, लिंग किंवा जन्मतारीख यांसारखी तुमच्या खात्याबद्दलची माहिती पाहणे, बदलणे अथवा हटवणे.
  • Google Play सारख्या काही Google अ‍ॅप्स आणि साइटवर तुमच्या डाउनलोडना आणि खरेदीला मंजुरी देणे.

Google माझी माहिती कशी आणि का गोळा करते व वापरते?

बहुतांश साइट आणि अ‍ॅप्सप्रमाणे, आम्ही तुमचे नाव आणि जन्मतारीख यांसारखी तुम्ही किंवा तुमच्या पालकांनी आम्हाला दिलेली माहिती गोळा करतो आणि तुम्ही आमची अ‍ॅप्स व साइट वापरत असताना आम्ही माहिती गोळा करतो. ही माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम करतो आणि ती आमची उत्पादने तुमच्यासाठी आणखी उपयुक्त बनवणे यासारख्या गोष्टींसाठी वापरतो. उदाहरणार्थ आम्ही पुढील गोष्टी करण्यासाठी डेटा गोळा करतो:

  • Google, आमचे वापरकर्ते आणि लोकांचे संरक्षण करणे: लोकांना ऑनलाइन आणखी सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही डेटा वापरतो, जसे की, फसवणूक शोधणे आणि रोखणे.
  • आमच्या सेवा पुरवणे: आम्ही आमच्या सेवा पुरवण्यासाठी डेटा वापरतो, जसे की, परिणाम मिळवण्यासाठी तुम्ही शोधत असलेल्या संज्ञांवर प्रक्रिया करणे.
  • आमच्या सेवांची देखभाल करणे आणि त्यांमध्ये सुधारणा करणे: उदाहरणार्थ, आमची उत्पादने अपेक्षेनुसार काम करणे कधी थांबवतात त्याचा आम्ही माग ठेवू शकतो. आणि कोणत्या शोध संज्ञांच्या शब्दलेखनात सर्वात जास्त वेळा चुका केल्या जातात हे समजून घेतल्याने आम्हाला आमच्या सर्व सेवांवरील स्पेल-चेक वैशिष्ट्यांमध्ये सुधारणा करण्यात मदत होते.
  • नवीन सेवा डेव्हलप करणे: डेटामुळे आम्हाला नवीन सेवा डेव्हलप करण्यात मदत होते. उदाहरणार्थ, Picasa या Google च्या पहिल्या फोटो अ‍ॅपमध्ये लोक त्यांचे फोटो कसे संगतवार लावत असत हे समजून घेतल्याने आम्हाला Google Photos डिझाइन आणि लाँच करण्यात मदत झाली.
  • आशय पर्सनलाइझ करणे, म्हणजे तुम्हाला आवडू शकतील असे आम्हाला वाटणार्‍या गोष्टी तुम्हाला दाखवणे. उदाहरणार्थ, तुम्हाला YouTube वर क्रीडांसंबंधी व्हिडिओ पाहणे आवडत असल्यास, आम्ही पाहण्यासाठी आणखी व्हिडिओची शिफारस करू शकतो.
  • तुम्ही ज्यावर आहात ती साइट, तुम्ही एंटर केलेल्या शोध संज्ञा किंवा तुमचे शहर आणि राज्य यांसारख्या माहितीच्या आधारावर तुम्हाला जाहिराती दाखवणे.
  • परफॉर्मन्सचे मापन करणे: परफॉर्मन्सचे मापन करण्यासाठी आणि आमच्या सेवा कशा वापरल्या जातात ते समजून घेण्यासाठी आम्ही डेटा वापरतो.
  • तुमच्याशी संवाद साधणे: उदाहरणार्थ, आम्हाला संशयास्पद अ‍ॅक्टिव्हिटी आढळल्यास, तुम्हाला सूचना पाठवण्यासाठी आम्ही तुमचा ईमेल अ‍ॅड्रेस वापरू शकतो.

Google ने काय सेव्ह करावे हे मला कसे ठरवता येईल?

तुमची सेटिंग्ज वापरून, आम्ही गोळा करत असलेला डेटा आणि आम्ही तो डेटा कसा वापरतो यावर तुम्ही मर्यादा घालू शकता. उदाहरणार्थ, आम्ही तुमचा YouTube इतिहास तुमच्या Google खाते वर सेव्ह करणे तुम्हाला नको असल्यास, तुम्ही YouTube इतिहास बंद करू शकता. तुम्ही तुमच्या अ‍ॅक्टिव्हिटी कंट्रोल मध्ये बदल केल्यास, तुमच्या पालकांना सूचित केले जाईल. तुमच्या गोपनीयता सेटिंग्जबद्दल अधिक जाणून घ्या

तुम्ही कधीही तुमच्याबद्दलची आणि तुमच्या Google खाते बद्दलची काही माहिती पाहणे आणि व्यवस्थापित करणे हे करू शकता.

Google कधीही माझी वैयक्तिक माहिती इतरांसोबत शेअर करते का?

आम्हाला कायदेशीररीत्या तसे करणे आवश्यक असण्यासारख्या मर्यादित बाबतींमध्ये वगळता, आम्ही तुमची माहिती Google च्या बाहेरील कंपन्या, संस्था किंवा व्यक्तींसोबत शेअर करत नाही. आम्ही ही माहिती शेअर केल्यास, ती संरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी आम्ही पावले उचलतो.

आम्ही काही वैयक्तिक माहिती शेअर करू शकतो:

  • तुमच्या पालकांसोबत आणि Google वरील कुटुंब गटासोबत.
  • ​​तुम्ही आणि तुमचे पालक आम्हाला परवानगी देता तेव्हा किंवा कायदेशीर कारणांसाठी. तसे करणे पुढील गोष्टींसाठी आवश्यक आहे असे आम्हाला वाटत असल्यास, आम्ही Google च्या बाहेर वैयक्तिक माहिती शेअर करू:
  • कोणताही लागू कायदा, नियम, कायदेशीर प्रक्रिया किंवा अंमलबजावणीक्षम शासकीय विनंतीची पूर्तता करणे.
  • संभाव्य उल्लंघनांच्या तपासासह, लागू सेवा अटींची अंमलबजावणी करणे.
  • शोधण्‍यासाठी, प्रतिबंधित करण्‍यासाठी किंवा अन्‍यथा पत्ता फसवणूक, सुरक्षितता किंवा तात्रिक समस्‍यांसाठी.
  • कायद्याद्वारे आवश्यक किंवा परवानगी असल्यानुसार, Google, आमचे वापरकर्ते अथवा लोक यांचे हक्क, मालमत्ता किंवा सुरक्षितता यांचे हानीपासून संरक्षण करणे.
  • बाह्य प्रक्रियेसाठी. आम्ही ज्यांच्यासोबत काम करतो त्या कंपन्यांना आम्ही देत असलेल्या सूचनांच्या आधारे डेटावर प्रक्रिया करण्यासाठी आम्ही वैयक्तिक माहिती पुरवतो. उदाहरणार्थ, आम्हाला ग्राहक सपोर्टबाबत मदत करण्यासाठी आम्ही बाह्य कंपन्या वापरतो आणि वापरकर्त्यांच्या प्रश्नांना प्रतिसाद देण्यासाठी आम्हाला कंपनीसोबत वैयक्तिक माहिती शेअर करावी लागते.

फोटो, ईमेल आणि दस्तऐवज यांसारख्या मी शेअर करत असलेल्या गोष्टी इतर कोण पाहू शकते?

तुम्ही वापरत असलेल्या Google अ‍ॅप्स आणि साइटमध्ये इतर लोकांसोबत विशिष्ट आशय शेअर करणे तुम्ही निवडू शकता.

तुम्ही शेअर केल्यावर, इतर लोक ते Google च्या बाहेरील अ‍ॅप्समध्ये आणि साइटवरदेखील रीशेअर करू शकतात हे विसरू नका.

तुम्ही तुमचा स्वतःचा आशय कधीही हटवू शकता, पण त्यामुळे तुम्ही आधीच शेअर केलेल्या प्रती हटवल्या जात नाहीत.

तुम्ही जे शेअर करता ते विचारपूर्वक करा आणि फक्त तुमचा विश्वास असलेल्या लोकांसोबत शेअर करा.

या विषयांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, तुम्ही कधीही आमचे गोपनीयता धोरण पाहू शकता.