Family Link
मुले वापरत असलेली अॅप्स व्यवस्थापित करून त्यांना दर्जेदार आशयाकडे वळवा आणि स्क्रीन वेळावर नजर ठेवा.
तुमची मुले शिकत, खेळत आणि ऑनलाइन एक्सप्लोर करत असताना त्यांना मार्गदर्शन करण्यात कुटुंब गट तुम्हाला मदत करतो.
प्रत्येक गोष्ट शेड्युलवर आणि प्रत्येकजणाला संपर्कात ठेवा. कौटुंबिक कॅलेंडर, टिपा आणि खरेदीच्या सूचींसह, आठवडा सहजपणे व्यवस्थापित करा.
Calendar
सर्वजणांच्या व्यग्र शेड्युलबाबत अद्ययावत राहण्यासाठी, शाळेतील नाटके, कौटुंबिक सहली आणि इतर इव्हेंट शेअर करा.
Google Keep
भेटवस्तूसंबंधी कल्पनांची नोंद करा आणि उपयुक्त टिपा, शेअर केलेल्या सूची व रिमाइंडरसह सक्रिय खरेदीची सूची ठेवा.
Google Assistant
रोजचे दिनक्रम मार्गावर ठेवण्याकरिता, Google Assistant ला तुमच्या कुटुंबातील सदस्याला “शाळेसाठी तयार व्हा” यासारखी रिमाइंडर असाइन करण्यास सांगा.
तुमचे आवडते मनोरंजन तुमच्या कुटुंब गटासोबत शेअर करून तुमच्या प्लॅन आणि सदस्यत्वांमधून अधिक मूल्य मिळवा.
पुस्तके, अॅप्स, स्टोरेज आणि बरेच काही शेअर करण्यासाठी, Google उत्पादने आणि सदस्यत्वांकरिता साइन अप करा.
तुम्ही कुटुंब गट तयार करता, तेव्हा तुम्ही कुटुंब व्यवस्थापक बनता. याचा अर्थ असा, की तुम्ही इतर कमाल पाच लोकांना सामील होण्यासाठी आमंत्रित करू शकता आणि त्यांनी तुमचे आमंत्रण स्वीकारल्यास, त्यांना तुमच्या कुटुंब गटामध्ये जोडले जाईल. कुटुंब व्यवस्थापक कधीही गट हटवू शकतात, आमंत्रित करू शकतात किंवा सदस्यांना काढून टाकू शकतात. आता तुमचा कुटुंब गट तयार करून सुरुवात करा.
कुटुंब गट तयार करण्यासाठी किंवा त्यामध्ये सामील होण्यासाठी सशुल्क सदस्यत्वाची आवश्यकता नसते. कुटुंब गट तुम्हाला आणि तुमच्या कुटुंब गटातील सदस्यांना तुम्ही आधीपासून वापरत असलेल्या Google उत्पादनांमधून बरेच काही मिळवू देतो. काही Google उत्पादनांसाठी, प्रीमियम सेवांकरिता कुटुंब प्लॅनची सदस्यत्वे खरेदी करणे आवश्यक असते.
तुम्ही कुटुंब गट तयार केल्यावर, तुम्हाला कुटुंब व्यवस्थापक कुटुंबासाठी शेअर करण्याकरिता निवडू शकेल अशा Google अॅप्स आणि सेवांची सूची दिसेल.
कुटुंब गटामधील पर्यवेक्षित खात्यांसाठी कुटुंब व्यवस्थापक त्यांची पालक नियंत्रणे व्यवस्थापित करू शकतात. कुटुंब व्यवस्थापक इतर पालकांना पर्यवेक्षित खाते व्यवस्थापित करणे यात मदत करण्यासाठी पालकांना मिळणाऱ्या परवानग्यादेखील देऊ शकतो.
कुटुंब गट तयार करण्यासाठी, तुमचे वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त (किंवा तुमच्या देशातील लागू संमती वय). तुमच्या कुटुंब गटामध्ये सामील होण्यासाठी, तुम्ही आमंत्रित करत असलेल्या लोकांकडे Google खाते असणे आवश्यक आहे. लोक एका वेळी फक्त एका कुटुंब गटामध्ये सामील होऊ शकतात आणि ते दर १२ महिन्यांतून फक्त एकदा दुसर्या कुटुंब गटावर स्विच करू शकतात.
कुटुंब गट आणि Family Link या दोन वेगवेगळ्या सेवा आहेत, ज्या एकत्र काम करू शकतात. कुटुंब गटासोबत तुम्हाला तुमची आवडती अॅप्स आणि सेवा शेअर करता येतात, जसे की YouTube, Play कुटुंब लायब्ररी, Google Assistant आणि बरेच काही.
तुम्ही तुमच्या कुटुंब गटामध्ये लहान मुलाचे खाते तयार करता, तेव्हा तेथे Family Link चा संबंध येतो. Family Link तुम्हाला तुमच्या लहान मुलाच्या खात्यासाठी डिजिटल मूलभूत नियम सेट करू देते, जसे की आशय प्रतिबंधित करणे, अॅप डाउनलोड आणि खरेदीला मंजुरी देणे, स्क्रीन वेळ सेट करणे आणि बरेच काही. Family Link बद्दल अधिक जाणून घ्या.
कुटुंब गट कसा काम करतो, तुम्ही आणि तुमचे कुटुंब काय शेअर करू शकता आणि इतर तपशिलांसाठी, Google For Families मदत केंद्र येथे भेट द्या.
सर्व उत्पादने किंवा वैशिष्ट्ये सर्व स्थानांमध्ये उपलब्ध नसू शकतात.